Ads 468x60px

Sunday, 17 January 2016

वयाने व मनाने ५० गाठलेल्या सर्वांसाठी

वयाने व मनाने ५० गाठलेल्या सर्वांसाठी 😀😀50 नंतरचाकाळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.


1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नासताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..


Tuesday, 24 November 2015

Honorable The Chief Justice of India: Fast-track justice for Talwars: Aarushi's parents

I just signed the petition "Honorable The Chief Justice of India: Fast-track justice for Talwars: Aarushi's parents" and wanted to see if you could help by adding your name.

Our goal is to reach 35,000 signatures and we need more support. You can read more and sign the petition here:

Sign My Petition


Thanks!
Blog Admin sa

Thursday, 17 October 2013

बायको

I love u हा मेसेज 11 मुलींना सेंड करा
,
,
,
,
आणि बघा 1 तरी तुम्हाला हो म्हणेल
,
,
,
आणि कोणीच हो बोलले नाही तर जिव दया तुमची लायकी तीच आहे


-----------------------------------------------------------------------------------------------------
मुलगा : wow,तुम्ही एकदम माझ्या बायको सारख्या दिसता..!
.
.
.
मुलगी : Ohhh..! काय आहे तुमच्या बायकोचं नाव ..?
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मी सध्यास्तित एकटाच आहे माझ अजुन लग्नच झालेल नाही
..!!
.
.
.
.
Moral : प्रपोज करायची नविन पद्धत शिका.!!

-----------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, 29 May 2013

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो . 
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो . 

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो . 

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो. 

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ……

Saturday, 25 May 2013

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे १०१ उखाणे - 101 Ukhane

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
---------- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन
२ नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
--------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी
३ पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते
४ सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई
५ हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी
६ शिंपल्यात सापडले माणिक मोती
------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी
७ महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
८ आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
----- रावांना घास देते गोड जिलेबीचा
९ मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स
१० आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी
११ सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी
१२ सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
१३ सासरचे निराजंन माहेरची फुलवात
----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
१४ जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
१५ माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर
१६ आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
१७ पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
१८ सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार
१९ मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
२० पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात
२१ गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
२२ सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
----- रावांचे नाव घेते ------ च्यावेळी
२३संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा
२४ स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
----- रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी
२५ रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
-----रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा
२६ नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा
----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा
२७ मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
----- रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार
२८ हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
----- रावांच्या जीवनात आहे मला गोडी
२९ सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
----- रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट
३० भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
----- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची
३१ जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
----- रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले
३२ शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
----- रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान
३३ आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
----- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
३४ कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
३५ माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
----- रावांच्या संसारात मन घेते वळून
३६ लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
----- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी
३७ संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
----- रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान
३८ लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने
३९ संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते ------ रावांबरोबर
४० नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
----- रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा
४१ सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
----- रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड
४२ अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
----- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली
४३ नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
आजपासून मी झाले ----- रावांची ग्रुहमंत्री
४४ शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
----- रावांची जोड जणू सागर आणि सरिता
४५ नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
----- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण
४६ चंदनाच्या झाडावर बसला मोर
----- रावांच्या जीवावर मी आहे थोर
४७ चंद्राचा उदय, समुद्राला भरती
----- रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती
४८ सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
----- रावांना देते मी जिलेबीचा घास
४९ पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
----- रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज
५० घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
----- रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस
५१ सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
----- रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले
५२ अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य
५३ मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
----- रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार
५४ आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
----- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे
५५ नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
----- रावांचे नाव घेते लक्ष दया सारे
५६ सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
----- रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला
५७ इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
----- रावांचे नाव घेते ----- ची सून
५८ खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
----- रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड
५९ इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
---- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर
६० फुलात फुल जाईचे फुल
----- रावांनी घातली मला भूल
६१ साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
----- रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज
६२ पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
----- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन
६३ संसार सागरात प्रीतीच्या लाटा
----- रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा
६४ आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
-----राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस
६५ सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह
६६ लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
----- रावांसाठी जीव झाला माझा वेडा
६७ आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या बरोबर
६८ आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा
६९ सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
----- राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी
७० मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
----- रावांचा सहवास लाभो जन्मभर
७१ प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या चरणी
७२ चांदीच्या ताटात पक्वानांची रास
----- रावांना देते लाडूचा घास
७३ रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास ----- रावांना देते
७४ मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते
७५ चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल
७६ नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर
७७ उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
७८ आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा
७९ ----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
८० मोत्याची माळ, सोन्याचा साज
----- रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज
८१ मंगळागौरी माते नमन करते तुला
----- रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला
८२ दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
----- रावांना ओवाळते मंगल आरती
८३ थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
८४ सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
----- रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा
८५ मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
----- रावांच्या संसारात लावीन दिप नवा
८६ संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल
----- रावांना लागली बाळाची चाहूल
८७ फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे
----- रावांच्या बाळाचे आज आहे बारसे
८८ गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
----- रावांच्या बाळाची आज आहे मौंज
८९ गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष
----- रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष
९० सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने ----- रावांच्या बाळाला
९१ वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
----- रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर
९२ दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
----- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र
९३ अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
-----रावांच्या नावावर भरते लग्नचुडा
९४ आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
----- रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात
९५ शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध
----- रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद
९६ जीवनात ही घडी अशीच राहू दे
----- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे
९७ संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
----- रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती
९८ कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
----- रावांचे नाव घेते माझ्या मनात
९९ श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
----- रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान
१०० निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे
१०१ नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

Thursday, 9 May 2013

test

-->
Related Posts Plugin for WordPress, Blogger...